पुणे : सुट्टीसाठी अनेकदा राज्यातील लाखो पर्यटक प्रसिद्ध किल्ल्यांना भेट देतात. जेव्हा, मोठ्या सुट्ट्या असतात तेव्हा अनेकदा प्रचंड गर्दी किल्ल्यांवर पाहायला मिळते. मात्र, या गर्दीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था नसल्याने पर्यटकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. पण, 15 ऑगस्टचे औचित्य साधून पुण्यातील किल्ले सिंहगडावर फिरण्यास गेलेल्या एका कुटुंबाला मात्र वेगळाच अनुभव मिळाला. नुकतेच सोशल […]
पुणे : सुट्टीसाठी अनेकदा राज्यातील लाखो पर्यटक प्रसिद्ध किल्ल्यांना भेट देतात. जेव्हा, मोठ्या सुट्ट्या असतात तेव्हा अनेकदा प्रचंड गर्दी किल्ल्यांवर पाहायला मिळते. मात्र, या गर्दीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था नसल्याने पर्यटकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. पण, 15 ऑगस्टचे औचित्य साधून पुण्यातील किल्ले सिंहगडावर फिरण्यास गेलेल्या एका कुटुंबाला मात्र वेगळाच अनुभव मिळाला. नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये सिंहगडावर दोन गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. गर्दीचा गैरफायदा घेत काही तरुणांनी तरुणींशी असभ्य वर्तन केल्याचे प्रकार समोर आल्याने हा वाद झाला. या संपूर्ण घटनेने सिंहगडावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. Pune sinhagad 2 group clash
हेही वाचा : हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक गोंधळ, कल्याणमध्ये 550 परीक्षार्थींचा ठिय्या अन् दिपकेंचा अल्टीमेटम
स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्टला सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचे पाहायला मिळाले. सुरक्षारक्षक किंवा पोलिसांची पुरेशी उपस्थिती नसल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्याचेही यावेळी दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीचा फायदा घेतला तरुण महिला, मुली यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा जाब विचारला असता दोन गटांत वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सिंहगडावर हे सर्व घडत असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे पोलीस किंवा कोणतेही सुरक्षारक्षक नव्हते.
प्राथमिक माहितीनुसार, भर पावसात झालेल्या हाणामारीमध्ये काही महिला आणि तरुणी जखमी झाल्या आहेत. सोशल मीडियावर यासंबधी व्हिडीओ व्हायरल होताच, अनेकांनी संताप व्यक्त केला. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून हवेली पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. घडलेल्या घटनेवरून राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. जो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेचे प्रतिक मानला जातो, तिथे जर महिला-मुलींसोबत छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर ही खूप गंभीर बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. शनिवारी आणि रविवारी सिंहगडप्रमाणेच लोहगड, विसापूर, राजगड आणि रायगड या किल्ल्यांवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दीचे स्वरूप पाहायला मिळाले.
| # | Наименование новости | Тональность | Информативность | Дата публикации |
|---|---|---|---|---|
| 1 | В Дагестане завели дело после падения лифта с людьми в многоэтажке | 0 | 0 | 25-06-2025 |
| 2 | Директору пансионата Калининграда, где упал лифт с пенсионерами, назначили домашний арест | 0 | 0 | 18-05-2023 |
| 3 | Группа туристов застряла на Эльбрусе | 0 | 10 | 25-07-2026 |
| 4 | СК возбудил дело после гибели двух человек в Петербурге на экскурсии по крышам | 0 | 0 | 22-09-2020 |
| 5 | В Калининграде блогер устроил дрифт на катере и перевернул байдарку с детьми | -5 | 7 | 07-07-2026 |
| 6 | Слоны подрались на арене цирка в Казани | 0 | 0 | 21-03-2021 |
| 7 | Экскурсовод упал со второго этажа Останкинской башни | 0 | 0 | 02-05-2023 |
| 8 | Туристы на парашюте зацепились за столб и сорвались с высоты в Турции | 0 | 10 | 05-08-2026 |
| 9 | हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक गोंधळ, कल्याणमध्ये 550 परीक्षार्थींचा ठिय्या अन् दिपकेंचा अल्टीमेटम | 0 | 11.36 | 17-08-2026 |
| 10 | Уголовное дело завели в КБР после падения ребенка и бабушки с кресла канатной дороги | 0 | 0 | 19-08-2021 |