Вход на сайт

Просмотр новости

Найдите то, что Вас интересует

हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक गोंधळ, कल्याणमध्ये 550 परीक्षार्थींचा ठिय्या अन् दिपकेंचा अल्टीमेटम

Дата публикации: 17-08-2026 03:57:56

मुंबई : हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत रविवारी (16 ऑगस्ट) महाराष्ट्रभर मोठा तांत्रिक गोंधळ उडाला. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीने नादुरुस्त कीबोर्ड दिले. तसेच सर्व्हर डाऊन आणि पेपर आपोआप सबमिट होणे, असे प्रकार घडले. यामुळे संतप्त उमेदवारांनी व्यवस्थेतील त्रुटींवर मनस्ताप व्यक्त केला. एकीकडे कल्याणमध्ये परीक्षार्थींनी गोंधळ घालत केंद्राबाहेर ठिय्या दिला. तर दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक […]

Основное содержимое страницы с новостью.

मुंबई : हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत रविवारी (16 ऑगस्ट) महाराष्ट्रभर मोठा तांत्रिक गोंधळ उडाला. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीने नादुरुस्त कीबोर्ड दिले. तसेच सर्व्हर डाऊन आणि पेपर आपोआप सबमिट होणे, असे प्रकार घडले. यामुळे संतप्त उमेदवारांनी व्यवस्थेतील त्रुटींवर मनस्ताप व्यक्त केला. एकीकडे कल्याणमध्ये परीक्षार्थींनी गोंधळ घालत केंद्राबाहेर ठिय्या दिला. तर दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले. high court clerk typing exam chaos

हेही वाचा : तरुणांनी गावातच राहून शेती प्रक्रिया उद्योग करून चांगल्या प्रकारे काम करावे; दरेकरांचे आवाहन 

हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेसाठी कल्याणसह मुरबाड, पनवेल, शहापूर, रायगड तसेच इतर भागांतून शेकडो परीक्षार्थी सकाळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावर आले होते. पण, परीक्षा केंद्रावर बसण्याचे योग्य नियोजन नसल्याचा आणि संगणक धूळखात पडलेले असल्याने त्याचा परीक्षार्थींना फटका बसला. परीक्षार्थींनी आरोप केले की, परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा प्रक्रिया विस्कळीत झाली. सकाळी 10 च्या सत्रातील उमेदवारांसह पुढील सत्रातील परीक्षार्थींनाही तासनतास प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे 550 परीक्षार्थींनी केंद्राबाहेर निषेध नोंदविला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक उमेदवारांना सदोष आणि जाम झालेले की-बोर्ड देण्यात आल्याने टायपिंग करताना अडचणी आल्या. त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने वेळेत पेपर पूर्ण करता आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

रविवारी दुपारीच निकाल जाहीर झाला पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक परीक्षार्थी अनुत्तीर्ण झाले. कल्याण येथील फक्त 5 ते 6 परीक्षार्थीच उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. अडचणींबाबत परीक्षा निरीक्षकांकडे तक्रार करूनही अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला. गोंधळानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी कल्याणमधील आंदोलक परीक्षार्थींशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. जोपर्यंत फेरपरीक्षा होत नाही, तोपर्यंत मागे हटू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर त्यांनी दिला. विशेष म्हणजे यावेळी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी परीक्षा केंद्रात येऊन परीक्षार्थींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्हाला तोंडी आश्वासन नको, तर लेखी स्वरूपात आश्वासन हवे, अशी भूमिका परीक्षार्थींनी घेतली. तसेच, केंद्राबाहेर आंदोलन करत न्यायाधीशांची गाडी परीक्षा केंद्रातून बाहेर जात असताना संतप्त परीक्षार्थींनी ती अडवून धरली होती.

छ. संभाजीनगरमध्येही परीक्षार्थी आक्रमक

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा रविवारी (16 ऑगस्ट) घेण्यात आल्या. मात्र कल्याणसह छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. यामुळे, शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबले होते. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

अभिजीत दिपकेंचा अल्टीमेटम

परीक्षेला बसल्यावर समजले की कॉम्प्युटर काम करत नाहीत आणि सिस्टिम लॉगआऊट होत आहे. तरीही केंद्रचालक विद्यार्थ्यांची अक्कल काढत होते. यात विद्यार्थी नाही, तर संपूर्ण सिस्टिम आणि सरकार फेल झाले आहे. सर्व सुविधा योग्यरीत्या पुरवून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपनीला त्वरित ब्लॅकलिस्ट करावे, असे म्हणत सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी संताप व्यक्त केला. रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत अभिजीत दिपके म्हणाले की, राज्य सरकारला परीक्षा यंत्रणा सुधारण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत. अन्यथा, राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Схожие новости

#Наименование новостиТональностьИнформативностьДата публикации
1एसआयआर प्रक्रियेबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंग यांची घेणार भेट08.6417-08-2026
2नाशिक महापालिकेवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खासदार राऊतांचा हल्लाबोल011.7417-08-2026
3किल्ले सिंहगडावर दोन गटात राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल, कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे011.3317-08-2026
4В Калининграде в очереди на АЗС заговорили о «заговоре» 0329-06-2026
5Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बायोपिकमध्ये अक्षय कुमार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?09.6517-08-2026
6What the Cockroach Movement Says About the Indian Economy08.8614-08-2026
7СК сообщил, что на борту упавшего под Калининградом вертолета находились четверо0025-03-2021
8India’s education minister resigns after weeks of protests09.2825-07-2026
9300 баллов ЕГЭ – и ты за бортом. А кто ...08.5307-08-2026

Классификация: . Схожих патентов: 0. Схожих новостей: 9. Тональность: 0. Информативность: 11.36. Источник: www.mymahanagar.com.