मुंबई : एसआयआर प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली होती. आज सोमवारी या मोहिमेचा शेवटचा दिवस आहे. परंतु, या प्रक्रियेवर आजपर्यंत अनेक विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. रोहित […]
एसआयआर प्रक्रियेबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंग यांची घेणार भेट
मुंबई : एसआयआर प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली होती. आज सोमवारी या मोहिमेचा शेवटचा दिवस आहे. परंतु, या प्रक्रियेवर आजपर्यंत अनेक विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार याचसाठी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहेत. त्याआधी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत ही प्रक्रिया कशा पद्धतीने चुकीची सुरू आहे आणि भाजप यामध्ये कशा प्रकारे हस्तक्षेप करत आहे, याची माहिती दिली. rohit pawar news
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेण्याआधी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एसआयआरबाबत बिहारमध्ये जे झाले तेच महाराष्ट्रात होण्याची भीती आहे. एक तुम्ही समजून घ्या, फॉर्म 6 हा जो फॉर्म आहे, तो रेग्यूलर फॉर्म असतोच. 2024 साली जे लोकसभेचे इलेक्शन झाले, तेव्हा महाराष्ट्रात लाखो मतदार वाढले होते, फॉर्म 6 च्या माध्यमातून अचानक वाढले अन् अचानक डिलिट सुद्धा झाले. त्यावर आम्ही सादरीकरण देखील केले होते, तो मुद्दा आम्ही मांडला होता. एकाच खोलीमध्ये हजार लोक राहतात असे तिथे दाखवण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर त्यातील एकही मतदार सापडला नाही, फॉर्म 6 चा वापर करून, निवडणुकीच्या आधी अनधिकृतपणे मतदार वाढवले जातात. त्यामुळेच आमचा फॉर्म 6 वर अक्षेप आहेत, असे यावेळी रोहित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा… किल्ले सिंहगडावर दोन गटात राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल, कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
तसेच, ते फॉर्म 6 चा वापर करून निवडणूक आयोग मतदारांच्या नोंदी कशा करणार हे आम्ही समजून घेणार आहोत. आमचे म्हणणे आहे की, विधानसभा, लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी असताना एवढा खटाटोप कशासाठी? खरं तर बीएलओंनी मतदारांच्या घरी तीन वेळा गेले पाहिजे. परंतु, ते एकदाही जात नाहीयेत, असा आरोपच रोहित पवारांनी केला आहे. तर, एवढ्याच दिवसात ही प्रक्रिया झाली पाहिजे, तेवढ्याच दिवसांमध्ये झाली पाहिजे. टार्गेट दिल्यामुळे हे बिएलओ त्यामध्ये नको ती कामे करत आहेत. हे कुठेतरी लोकशाहीला धोकेदायक होऊ शकते. संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे, तो देखील जाऊ शकतो. हे आमचे सर्वांचे मत आहे, असेही यावेळी रोहित पवार यांनी म्हटले आहे.