Вход на сайт

Просмотр новости

Найдите то, что Вас интересует

नाशिक महापालिकेवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खासदार राऊतांचा हल्लाबोल

Дата публикации: 17-08-2026 05:28:11

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून सोमवारी (17 ऑगस्ट) त्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था तसेच खड्ड्यांमुळे काही नागरिकांचा झालेल्या मृत्युवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका आणि भाजपच्या हलगर्जीपणामुळे […]

Основное содержимое страницы с новостью.

नाशिक महापालिकेवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खासदार राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून सोमवारी (17 ऑगस्ट) त्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था तसेच खड्ड्यांमुळे काही नागरिकांचा झालेल्या मृत्युवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका आणि भाजपच्या हलगर्जीपणामुळे या लोकांचे मृत्यू झाले असून नाशिक कुंभमेळा 2027चे आयुक्त शेखर सिंह यांनी माफी मागितली. पण, महापालिका आयुक्तांनी मागितली का माफी? गिरीश महाजनांनी माफी मागितली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. Shivsena UBT Sanjay Raut press conference today

हेही वाचा : किल्ले सिंहगडावर दोन गटात राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल, कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे 

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, “10 वर्षांपूर्वी नाशिकचा लौकिक खड्डेमुक्त शहर असा होता. उत्तम प्रशासनामुळे नाशिक एक सुंदर शहर मानले जायचे. पण आजचे चित्र अत्यंत भयंकर आणि विद्रूप आहे. नाशिकचे खड्डे आता देशभरात चेष्टेचा विषय झाले आहेत. मखमलाबाद रोडवर फळे विकणाऱ्या एका महिलेने डोळ्यात पाणी आणून मला सांगितले की, साहेब आम्ही कसे जगायचे? ही अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ओढावली आहे.” असे म्हणत टीका केली. “खड्डयात पडून आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, पण प्रशासन हा आकडा लपवत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले 6 जवान शहीद झाले होते, इथे तर 10 लोक मरण पावले आहेत. हे मृत्यू नसून प्रशासनाने केलेल्या 10 हत्या आहेत. या ठेकेदारांवर आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. गरज पडल्यास आम्ही न्यायालयात जाऊन प्रायव्हेट गुन्हे दाखल करू.” असे म्हणत हल्लाबोल केला.

“पंतप्रधान आणि फडणवीस हे 2047च्या विकासाच्या आणि स्पेस टेक्नॉलॉजीच्या गप्पा मारतात. पण इथले खड्डे बघितले की वाटते, नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का? कारण चंद्रावरही खड्डे आहेत. पण चंद्रावर गेलेला नील आर्मस्ट्राँग सुखरूप परत आला, इथे मात्र चंद्रावर (नाशिकमध्ये) रोज लोक खड्ड्यात पडून मरत आहेत.” असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “कुंभमेळ्याचे बजेट 15 हजार कोटींवरून थेट 45 हजार कोटींवर गेले. आधी 15 हजार शौचालय बांधणार होते, आता 55 हजार बांधणार आहेत. त्यामध्ये 10 हजार VIP शौचालय आहेत. त्याचा उपयोग काय? कुंभमेळ्याच्या नावाखाली शौचालयामध्ये पैसे खाणारा हा भाजपचा आणि गिरीश महाजनांचा जामनेर पॅटर्न आहे.” असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली.

Схожие новости

#Наименование новостиТональностьИнформативностьДата публикации
1एसआयआर प्रक्रियेबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंग यांची घेणार भेट08.6417-08-2026
2Raj Thackeray asks CM to act against BJP chief for smiling while speaking on Mumbai's rain-related deaths-2304-07-2026
3Ayodhya temple donations row: Uddhav announces ‘Ram Raksha’ protest in Maharashtra from July 5-2503-07-2026
4हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत तांत्रिक गोंधळ, कल्याणमध्ये 550 परीक्षार्थींचा ठिय्या अन् दिपकेंचा अल्टीमेटम011.3617-08-2026
5₹15 crore will be paid to MPs tonight, says Shiv Sena (UBT) leader0505-07-2026
6Канцлер Австрии призвал провести расследование гибели демонстрантов в Белоруссии0013-08-2020
7Lula lanza su campaña con un discurso enfocado en la seguridad y los programas sociales04.8316-08-2026
8Зеленский напомнил о возможности досрочного роспуска Рады0031-08-2020
9Лидер украинской партии "Голос" Святослав Вакарчук заявил о сложении мандата депутата Рады0011-06-2020
10Мэр Носков рассказал о последствиях ракетного удара по Самаре ночью 15 августа012.215-08-2026

Классификация: Международные. Схожих патентов: 0. Схожих новостей: 10. Тональность: 0. Информативность: 11.74. Источник: www.mymahanagar.com.